Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला ६२ लाखांचा दंड


Main News

पुणे, दि. ३१ (पीसीबी) - पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हल आयोजकांना विनापरवाना डोंगराचे सपाटीकरण केल्याने तब्बल ६२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हवेली तालुक्याच्या प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी ही कारवाई केली. तसंच दंडाची रक्कम तातडीने भरण्याचे आदेशही ज्योती कदम यांनी दिले आहेत.

 

सनबर्न फेस्टिव्हलसाठी केसनंद गावातील डोंगराचे मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात ले. मात्र यासाठी तहसीलदार किंवा जिल्हा खनिकर्म विभागाची परवानगी आवश्यक होती. पण आयोजकांकडून सपाटीकरणासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रांताधिकरांनी आयोजकांना दणका दिला.  केसनंद परिसरात डोंगराचे सपाटीकरण, मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली आहे. त्यामुळे त्याविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

 

दरम्यान, पुण्यात २८ ते ३१ डिसेंबरदरम्यान सनबर्न फेस्टिव्हल रंगत आहे. त्यामुळे सरकारने आयोजकांकडून करमणूक करापोटी कोटी ७७ लाख रुपयांची वसुली केली आहे. आयोजकांनी कोटीचा डीडी आणि ७७ लाखाची रोकड जिल्हा करमणूक कर विभागाकडे जमा केली आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin