Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


पुण्यात आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक


Main News

पुणे, दि. ३० (पीसीबी) - पुण्यातील स्वारगेटमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. सुरेश ढमाले यांच्या तक्रारीनंतर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. राजेंद्र बी. दोंड से अटक केलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

 

तक्रारदार सुरेश ढमाले यांनी २०१२ मध्ये फ्लॅट आणि दुकान खरेदी केले होते. पण त्यांनी खरेदी केलेल्या दुकानाच्या दरात रेडी रेकनर आणि खरेदी किंमतीमध्ये ३५ लाखांची तफावत येत होती. यावरुन आयकर विभागाचा अधिकारी राजेंद्र दोंड त्यांची अडवणूक करत होता. शिवाय या प्रकणातून सुटण्यासाठी ढमाले यांच्याकडून लाखांची लाच मागत होता.

 

राजेंद्र दोंड सातत्याने लाचेची मागणी करत असल्यामुळे सुरेश ढमाले यांनी सीबीआयच्या अँटी करप्शन ब्युरोकडे याबाबत तक्रार केली. ढमालेंच्या तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर सापळा रचून, गुरुवारी संध्याकाळी राजेंद्र दोंड यांना लाचेचा पहिला हफ्ता म्हणून एक लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin