Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


पुण्यातील कोंढव्यात बेकरीला लागलेल्या आगीत सहा कामगारांचा मृत्यू


Main News

पुणे, दि. ३० (पीसीबी) - पुण्यातील कोंढवा बुद्रुकमधील बेकरीला शुक्रवारी (दि. ३०) पहाटे लागलेल्या आगीत सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. तालाब कंपनीजवळ असणाऱ्या बेक्स ऍण्ड केक्स बेकरीला आग लागली होती. या बेकरीमध्ये सहा कामगार झोपले होते. या कामगारांचा आगीत होरपळल्याने मृत्यू झाला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून ही आग विझवली आणि कामगारांचे मृतदेह बाहेर काढले. बेकरीला बाहेरुन कुलूप लावण्यात आले असल्याने कामगारांना बाहेर निघता आले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर संपूर्ण नियंत्रण मिळवले असून कुलिंग ऑपरेशनला सुरुवात केली आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin