Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


ब्रदरहुड फाउंडेशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत ट्रीआ लीजेंड संघ विजेता


Main News

पुणे, दि.२८ (पीसीबी) – ब्रदरहुड फाउंडेशनच्या वतीने गुलटेकडी येथील कटारिया हायस्कूल येथे तीन दिवसीय प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ट्रीआ लीजेंडच्या संघाने विजेतेपदाचा, तर दादू चैलेंजर्स संघाने उपविजेतेपद पटकाविले. आदित्य केडियाल याला उत्कृष्ट फलंदाज, आदित्य कन्सल यास उत्कृष्ट गोलंदाज आणि योगेश अग्रवाल यास संघरक्षकाचा मान मिळाला आहे.

या स्पर्धेत तनिष्क चॅलेंजर्स, गोयसगंगा अवेंजर्स, ट्रिआ लेजेंड्स, दादू चेलेंजर्स, श्रीराम टाइगर्स, साई रॉयल स्ट्राइकर्स , ऐरिस चेलेंजर्स ,राहुल रॉयल्स ,विजय स्मॅशर्स आदी संघ सहभागी झाले होते.

यावेळी अभिनेत्री नेहा हिंगे, ब्रदरहुडचे विश्वस्त जयप्रकाश गोयल, अध्यक्ष रमेश गोयल, अजय गोयल, पवन बन्सल, शाम गोयल, विक्रम अग्रवाल आदी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin