Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


पाचशेच्या नोटा एटीएममध्येच मिळणार


Main News

पुणे, दि.२८ (पीसीबी) – कॅलिब्रेट झालेले कोणतेही केंद्र बंद न ठेवण्याचा आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा फक्त एटीएम मधूनच देण्याच्या सुचना रिझर्व्ह बँकेने बँकांना दिल्याने शहारातील कार्यरत एटीएमची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. बँकांमधील रांगा कमी करण्यासाठी आणि बँकांच्या शाखांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

रिझर्व्ह बँकेतर्फे रोकड वितरण करण्यात आले आहे या नोटा बँकेतील काउंटरवर न देता एटीएममध्येच टाकण्यात याव्यात असेही या आदेशात म्हटले आहे. कॅलिब्रेट झालेले कोणतेही एटीएम बंद ठेवू नये त्यात पुरेशी रक्कम असेल याची खबरदारी घ्यावी तसेच प्रामुख्याने पाचशे व शंभर रुपयांच्या नोटांचा यामध्ये भरणा असावा अशा रिझर्व्ह  बँकेच्या सूचना असल्याचे सूत्रांनी सागीतले.

रिझर्व्ह बँकेकडून आम्हाला पाचशे रुपयांच्या नव्या नोटा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत एटीएममधून पैसे काढणे खातेदारांसाठीही सायीचे ठरेल असे कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी सांगीतले. एटीएममधून पैसे दिल्याल सर्व खातेदारांना समप्रमाणात पैसे मिळतील असा रिझर्व्ह बँकेचा हेतु असल्याचे एका राष्ट्रीयकृत बँकेच्या सरव्यवस्थापकांनी सांगीतले.
 
गेल्या आठवड्यापर्यंत रोख रकमेच्या अभावी शहरातील १० ते २० टक्क्यांनी आसपासच्या एटीएम सुरु होती. स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्वाधिक एटीएम सुरु होते. आता मात्र २५ ते ४० टक्क्यांदरम्यान एटीएम सुरु झाली आहेत. बँकांना मिळणाऱ्या रोख रकमेचा मोठा हिस्सा टाकायचा असल्याने लवकरच कार्यरत एटीएमची संख्या वाढेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या एटीएममधूनच प्रत्येक खातेदाराला एटीएम कार्डावर चोवीस तासांत २५०० रुपये काढता येतात. रोकडटंचाई अजूनही कायम असल्याने एटीएमदद्वारे रक्कम काढण्यावरील मर्यादा कायम राहणार असल्याचे सूत्रांनी सांगीतले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin