Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


पुण्यातील सनबर्न फेस्टिवलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा


Main News

पुणे, दि. २८ (पीसीबी) - पुण्यात सनबर्न फेस्टिवलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सनबर्नच्या आयोजनाला तहसीलदारांनी परवानगी दिलेली आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे सनबर्न फेस्टिवलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

राज्य सरकारने सनबर्न फेस्टिवलला परवानगी दिली आहे. मात्र स्थानिक लोक आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी सनबर्न फेस्टिवलला विरोध केला होता. पुण्यातील शिवसेनेशी संबंधित असलेले शेतकरी संदीप भोंडगे यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र सनबर्न फेस्टिवलला तहसीलदारांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे याबद्दल सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे पुण्यातील सनबर्न फेस्टिवलच्या आयोजनात आता कोणताच अडथळा राहिलेला नाही. आजपासून सनबर्न फेस्टिवलला सुरुवात होते आहे.

 

सनबर्न फेस्टिवल हा बेकायदेशीर कार्यक्रम आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या कार्यक्रमात अंमली पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळेच गोव्यात या कार्यक्रमावर दोन वर्षे बंदी घालण्यात आली होती,’ असे म्हणत संदीप भोंडगे यांनी सनबर्न फेस्टिवलविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने भोंडगे यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

 

पुण्यातील सनबर्न फेस्टिवलला सनातन संस्थेनेदेखील विरोध केला होता. सनबर्नकडून करचुकवेगिरी केली जात असल्याचे, सनबर्न फेस्टिवलमध्ये अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे आरोप सनातन संस्थेकडून करण्यात आले होते. संतांच्या भूमीत नंगानाच होऊ देणार नाही,’ असे सनातन संस्थेने म्हटले होते. याआधी गोव्यात सनबर्न फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका तरुणीचा अंमली पदार्थाच्या सेवनाने मृत्यू झाला होता. मात्र त्यावेळी सनबर्न फेस्टिवलच्या आयोजकांनी जबाबदारी झटकली होती. त्यामुळे या फेस्टिवलचे आयोजित करताना यामधील कोणत्याही अनुचित प्रकारासाठी आयोजकच जबाबदार असतील, हे लिखित स्वरुपात कबूल करुन घ्या,’ असे सनातन संस्थेने पत्रकार परिषदेत म्हटले होते.

 

दुपारी ते रात्री १० या वेळेत सनबर्न फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे. खाद्य, संगीत आणि मनोरंजन ही सनबर्न फेस्टिवलची संकल्पना आहे. गोव्यात २००७ मध्ये पहिल्यांदा

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin