Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


पृथ्वीराज चव्हाणांवर राष्ट्रवादीची आगपाखड; आंबेडकर स्मारक आणि शिवस्मारक चव्हाणांमुळे रखडले


Main News

पुणे, दि. २८ (पीसीबी) -  अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि इंदू मिलमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आम्ही आग्रही होतो. मात्र, ते का होऊ शकले नाही याचे उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच देऊ शकतील, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आगामी दहा महापालिका आणि २७ जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादीची पुण्यात एकदिवसीय बैठक होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आजी- माजी आमदार तसेच सर्व जिल्हाध्यक्ष बैठकीस उपस्थित राहणार आहेत. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. 

शिवस्मारक व डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाच्या परवानग्या आमच्या काळातच अंतिम टप्प्यात आल्या होत्या. परंतु, त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत उत्सुकता दाखवली नाही, असा आरोप करून तटकरे म्हणाले, सत्ताबदल झाल्यानंतर आताच्या सरकारने उर्वरित कार्यवाही पूर्ण केली. हेच काम आम्हीदेखील करू शकलो असतो. मात्र, अपेक्षित मंजुऱ्या का मिळाल्या नाहीत, याचे उत्तर त्या वेळचे मुख्यमंत्रीच देऊ शकतील, असे सांगून तटकरे यांनी दोन्ही स्मारकांच्या विलंबाचे खापर पृथ्वीराज चव्हाण यांच्या डोक्यावर फोडले. 

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमचा प्रासंगिक करार होता, असे म्हणणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही तटकरे यांनी टीका केली. ‘प्रासंगिक करार हा शब्दप्रयोग मी पहिल्यांदाच ऐकला. यामुळे चांगले मनोरंजन झाले. याची वेगळ्या शब्दात संभावना करता येईल; पण मी ती करणार नाही. समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच व्यापक भूमिका घेतली. राजकीय टीकेची सुरुवातदेखील काँग्रेसकडून पहिल्यांदा झाली. पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी आमच्यावर टीका केली. आम्ही पहिल्यांदा टीका केली नाही. प्रचाराच्या काळात उत्तर मात्र जरूर दिले, असे तटकरे म्हणाले.

मोफत सल्ला नको
मोदींच्या उपस्थितीत झालेल्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजनात सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहभागावरून काँग्रेसकडून जोरदार टीका झाली. या संदर्भात तटकरे म्हणाले, की ‘पृथ्वीराज चव्हाणांना काय वाटते यावर ‘राष्ट्रवादी’चे धोरण ठरणार नाही. त्यांनी मोफत सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये. यासाठी आमचे नेतृत्त्व समर्थ आहे. ज्यांनी केवळ आमचा द्वेषच केला त्यांच्या वक्तव्याला आम्ही महत्त्व देत नाही.’

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin