Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


भोसरीतील विश्वविलास लॉजमध्ये डांबून ठेवून आरोपीकडून खंडणी उकळली


Main News

पुणे, दि. २७ (पीसीबी) - चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचे क्राइम ब्रँचचे ऑफिसर असल्याचे सांगून पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयातून दोन सराईत गुन्हेगारांनी अपहरण केल्याचे समोर आले आहे. या गन्हेगारांनी आरापीला भोसरीतील विश्वविलास लॉजमध्ये डाबून ठेवून त्याच्याकडून २ लाख ७ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मुंबईच्या माहिम येथील धोबीघाट चाळीत राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने विनोद लोटण खैरनार (वय ३०, रा. शांती धाम सोसायटी, सिडको, नाशिक) व दिपक धनराव बोराळे (वय ३४, रा. जय गंगा सोसायटी, साकरी रोड, धुळे) या दोघा सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.

तक्रारदार हा १५ डिसेंबर रोजी शिवाजीनगर न्यायालयात येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील तारखेस आला होता. त्यावेळी दोघा आरोपींनी संगनमत करून आपण क्राईम ब्रँचचे ऑफिसर असल्याचे सांगून भोसरी येथील विश्वविलास लॉजमध्ये नेऊन त्याठिकाणी त्याला डांबून ठेवले. गुन्ह्यामधील अटक टाळण्यासाठी २ लाख ७ हजार रुपये घेतले. फौजदार बनसोडे तपास करीत आहेत.   

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin