Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला 'सनातन'चा विरोध


Main News

पुणे, दि. २७ (पीसीबी) - ईयर एंडिंगच्या निमित्ताने पुण्याजवळ होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलला हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेने विरोध केला आहे. सनबर्नमुळे महाराष्ट्राची संस्कृती धोक्यात येईल, असा सनातनचा दावा आहे. दुसऱ्या बाजूला राज्याचे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावळ यांनी पत्रकार परिषद घेऊन सनबर्नला सरकारचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.

 

संगीत, मनोरंजन, गाणी, खाद्ययात्रा, शॉपिंग यांनी भरलेला सनबर्न फेस्टिव्हल हा २८ ते ३१ डिसेंबरच्या दरम्यान पुणे-नगर रस्त्यावरील केसनंद येथे होणार आहे.

 

राज्य सरकारांनी दिलेल्या आमंत्रणानंतरच सनबर्न पुण्यात कार्यक्रमासाठी तयार झाल्याचे रावळ यांचे म्हणणे आहे. देशातील आघाडीचे गायक आणि डीजे आर्टिस्ट यांच्या लाईव्ह परफॉर्मन्समुळे तरुणाईमध्ये सनबर्नच मोठे आकर्षण आहे. मागील नऊ वर्षे सनबर्न गोव्यामध्ये आयोजित होत होता. त्यादरम्यान सनबर्नने कर चुकवल्याचा आरोप सनातनने केला आहे. त्याचबरोबर सनबर्नमध्ये अमली पदार्थांचा वापर होत असल्याचेही सनातन संस्थेचे म्हणणे आहे.

 

सनबर्नने सनातनचे सर्व आरोप फेटाळले आहेत. अंमली पदार्थ वापरल्याचा सनबर्नवर एकही गुन्हा नाही, से सनबर्नच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सनबर्नवर अंमली पदार्थांच्या वापराचा आरोप करणाऱ्या सनातन संस्थेवरच राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मानसिक आजारांसाठी वापरली जाणाऱ्या औषधांचा साठा केल्याबद्दल गुन्हा नोंद केला आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin