Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


लग्न मोडल्याच्या कारणामुळे तरुणीची फेसबुकवर बदनामी


Main News

पुणे, दि. २७ (पीसीबी) - जमलेले लग्न मोडल्यामुळे तरुणी आणि तिच्या भावाचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्यावर अश्लील फोटो टाकून बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बदनामी करणाऱ्या तरुणाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.

गौतम अशोक चिटपेल्ली (वय २८, रा. मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी तरुणीने येरवडा पोलिसांकडे तक्रार दिली आहे. २४ डिसेंबर २०१२ ते ६ मे २०१४ या कालावधीत ही घटना घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतमचे तक्रारदार तरुणीशी लग्न जमले होते. त्यानंतर दोघांचा साखरपुडा झाला होता. साखरपुडा झाल्यानंतर आरोपीने तरुणीशी लग्नाअगोदर लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यात वादावादी होऊन लग्न मोडले.

त्यामुळे चिडलेल्या गौतमने तरुणी आणि तिच्या भावाच्या नावाचे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले. त्याच्यावर तिचे अश्लील फोटो अपलोड केले. ते फोटो तरुणीच्या नातेवाइकांना आणि मित्रांना पाठवून बदनामी केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणीने येरवडा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार तपास करून आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणी गौतमला न्यायालयात  हजर करण्यात आले. तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील डी.एल. मोरे यांनी केली. न्यायालयाने त्याला २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin