Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


गिरीश बापट यांचा माज व चरबी उतरवणार; विजय शिवतारेंची आगपाखड


Main News

पुणे, दि. २७ (पीसीबी) - पुण्यातील मेट्रोच्या भूमिपूजनावरुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू झाले आहेत. भूमिपूजन कार्यक्रमाला न बोलावल्याने जलसंपदा राज्यमंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे संतापले आहेत. गिरीष बापट यांचा माज आणि चरबी उतरवणार अशा आक्षेपार्ह शब्दात शिवतारे यांनी गिरीश बापट यांच्यावर आगपाखड केली आहे.

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमाचे आमंत्रण न दिल्याने शिवतारे नाराज आहेत. शिवतारे यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर टीका केली आहे. गिरीश बापट यांच्यात सत्तेचा उर्मटपणा आहे, असे शिवतारे यांनी म्हटले आहे. गिरीश बापट हे संसदीय कामकाज मंत्री असल्याने त्यांना नियमांची माहिती आहे. पुणे महापालिकेतील कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार मंत्री म्हणून मला स्थान दिले जाते. मग मेट्रोच्या भूमिपूजनात आम्हाला का डावलले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझ्या मतदारसंघात पुणे महापालिकेतील तीन प्रभाग येतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले.  

बापट हे घाणेरडे राजकारण करत आहे. त्यांचा हा माज उतरवणार असे त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला शिवसेनेसोबत युती हवी, पण पुण्यात त्यांना युती नको, भाजपची ही दुटप्पी भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यासोबत याविषयी बोलणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, शिवतारे यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केल्यावर भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवतारे यांच्या विधानातून शिवसेनेची मानसिकता दिसून येते, असा चिमटा भंडारी यांनी काढला आहे. शिवतारे यांना प्रसिद्धीची हाव असून व्यासपीठावर त्यांना स्थान न मिळाल्याने ते चिडले असे भंडारी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

शिवस्मारक आणि मेट्रो भूमिपूजनावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगला असून भूमिपूजन सोहळ्यानंतरही हा वाद काही थांबलेला नाही. पुणे मेट्रोचे भूमिपूजन यापूर्वी काँग्रेसमुळे गाजले होते. नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होण्यापूर्वी एक दिवस अगोदर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन केले होते. तर पुणे महापालिकेने शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. सुदैवाने नरेंद्र मोदींसोबत शरद पवार यांनाही आमंत्रण गेल्याने संभाव्य वाद टळला होता.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin