Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


पुण्यातील बिबट्याला पकडण्यास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश


Main News

पुणे, दि. २४ (पीसीबी) - कोंढवा येथील एनआयबीएम इन्स्टिट्युटमध्ये आज (शनिवारी) सकाळी शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर यश मिळाले आहे.
 
आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एनआयबीएम इन्स्टिट्युटच्या एका खोलीत बिबट्या असल्याचे सुरक्षा रक्षकांना आढळून आले. सुरक्षेसाठी बिबट्या असलेली खोली बंद करण्यात आली. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोचले. त्यांनी तब्बल साडे तीन तासांच्या मोहिमेनंतर बिबट्याला इंजेक्‍शन दिले आणि त्यानंतर पकडले. काही वेळाने त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे. बिबट्या ज्या खोलीत शिरला होता, ती खोली चारही बाजूने बंद होती.
 
कुत्र्याची शिकार करताना बिबट्या लोकवस्तीत शिरला असल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. अलिकडच्या काळात जंगल सोडून लोकवस्तीत बिबट्या आल्याचे अनेक उदाहरणे समोर येत आहेत. यापूर्वी कोथरूडमध्येही अशी घटना समोर आली होती.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin