Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


कोंडव्यातील ‘एनआयबीएम’ कॅम्पसमध्ये बिबट्याचा वावर


Main News

पुणे, दि. २४ (पीसीबी) - पुण्यातील कोंडवा ‘एनआयबीएम’ कॅम्पसमध्ये बिबट्या शिरल्याने परिसरात घबराट पसरली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्या नक्की कुठे लपून बसला आहे, याची कुठलीच माहिची उपलब्ध झाली नाही. त्यामुळे त्याचा शोध घेताना अडचणी येऊ लागल्या आहेत. 

या परिसरामध्ये घनदाट झाडी आहे. त्यामुळे बिबट्याचा नेमका माग काढता येत नाही.   घनदाट झाडीमुळे या परिसरात बिबट्याचा सतत वावर असतो. पुण्यात बिबट्याचा वावर दिसण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी कोथरुडमध्ये बिबट्या दिसला होता. अगदी घराच्या शेजारी एका झाडाच्या शेजारी बिबट्या आढळला होता. दरम्यान बिबट्याच्या वावरामुळे परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा शोध घेण्याचा वन विभागाच्या कर्मचाऱ्याकडून जोरात प्रयत्न सुरू केले आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin