Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


मोदींआधीच काँग्रेसने पुणे मेट्रोचे केले भूमीपूजन


Main News

पुणे, दि. २३ (पीसीबी) – पुणे मेट्रो प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होण्याच्या एक दिवस आधीच काँग्रेसने भूमीपूजनाचा कार्यक्रम उरकला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते कुदळ मारून काँग्रेसने शुक्रवारी (दि. २३) मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन केले. 

यावेळी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील आणि विश्वजित कदम उपस्थित होते. पुणे मेट्रोसाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या पृथ्वीराज चव्हाण यांनीच मुख्यमंत्री असताना दिल्या होत्या. या प्रकल्पासाठी भाजपने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत, असा दावादेखील यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला. शनिवारी पुणे मेट्रोचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. 

मात्र पुणे महापालिकेने शरद पवारांच्या हस्ते भूमीपूजन करण्याचे ठरवले असताना मोदींच्या हस्ते भूमीपूजन का ?,’ असा सवाल काँग्रेसकडून विचारण्यात आला होता. त्यामुळेच पंतप्रधान मोदींच्याआधीच काँग्रेसने पुणे मेट्रोचे भूमीपूजन उरकले.




Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin