Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


...आता पुणे मेट्रोचे भूमिपूजन २३ डिसेंबरला काँग्रेस करणार


Main News

पुणे, दि. २२ (पीसीबी) - पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावरून रंगलेली श्रेयवादाची लढाई सुरूच असून यात आता काँग्रेसने उडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित कार्यक्रमाआधीच मेट्रोचे भूमिपूजन उरकरण्याचा इशारा देणारी राष्ट्रवादी काँग्रेस शांत झाली आहे. मात्र, येत्या २३ डिसेंबरला पुण्यात स्वारगेट येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मेट्रोचे भूमिपूजन करण्याचे काँग्रेसने ठरवले आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांना भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला निमंत्रण न दिल्यामुळे अशाप्रकारची भूमिका घेतली होती. त्यासाठी पुणे महानगरपालिकेत काँग्रेसच्या पाठिंब्याने ठरावही मंजूर करण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर राष्ट्रवादीचा या कार्यक्रमाला असणारा विरोध मावळला होता. त्यामुळे आता बिथरलेल्या काँग्रेसने एकट्यानेच २३ डिसेंबरला भूमिपूजन करण्याचा घाट घातला आहे.

पुणे मेट्रोला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मान्यता मिळाली होती. पुण्यात मेट्रो आणण्याच्या निर्णयात त्यांचा महत्वाचा वाटा आहे, असा दावा रमेश बागवे यांनी केला आहे. त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते २३ डिसेंबरला सकाळी १० वाजता काँग्रेसकडून भूमीपूजन करण्यात येईल, असे पुण्याचे काँग्रेस अध्यक्ष बागवे यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin