Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

तरुणीला अश्लिल मेसेज पाठवणाऱ्याला दोन वर्षांची शिक्षा; न्यायालयाचा ४८ तासांत निकाल

Main News

पुणे, दि. ११ (पीसीबी) - तरुणीला मोबाईलवर अश्लिल मेसेज पाठवणाऱ्या आरोपीला  दोन वर्षांच्या कठोर कारावासाची आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खेड-राजगुरुनगर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आज घटनेनंतर अवघ्या ४८ तासांत आरोपीला शिक्षा सुनावली. ही राज्यातील पहिलीच घटना आहे. 

अतुल गणेश पाटील (चाकण) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 

अतुल गणेश पाटील याने तरुणीला तिच्या मोबाईलवर अश्लिल मेसेज पाठवला होता. या प्रकरणी आरोपीविरुद्ध चाकण पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याला तातडीने अटक करून न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले होते. खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जे. तांबोळी यांच्यासमोर झाली. त्यांनी आरोपीला दोषी ठरवून दोन वर्षांची कठोर तुरुंगवासाची शिक्षा आणि ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एका महिन्याचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

विशेष म्हणजे पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास २४ तासांत पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणी सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर अवघ्या ४८ तासांत या खटल्याचा निकाल लागला आहे. राज्यातील हा सर्वात जलद निकाल असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin