Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

...तर विठ्ठल शेलारची भाजपमधून हकालपट्टी - रावसाहेब दानवे

Main News

पुणे , दि. ११ (पीसीबी) - भाजप गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्यांचे कधीही समर्थन करणार नाही. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पुणे जिल्ह्यातील विठ्ठल शेलार या गुंडाबाबत चौकशी करुन त्याची पक्षातून काढून टाकण्याची कारवाई केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि भाजप नेते गिरीश बापट यांच्या उपस्थितीत शेलार याने भाजपमध्ये प्रवेश केला. मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेल्या शेलार याला उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. त्याच्याविरुध्द अनेक गंभीर गुन्हे नोंदले गेले आहेत. नैतिकतेचे धडे इतरांना शिकवत असताना गुंडाना पक्षात प्रवेश दिल्याने भाजपवर चहूबाजूंनी टीका होत आहे. या पार्श्र्वभूमीवर दानवे यांनी शेलार याच्याबाबत माहिती घेऊन गुन्हे दाखल असल्यास पक्षातून काढून टाकले जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भ्रष्टाचाराविरोधात टेंभा मिरविणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे हे लक्ष्मीदर्शनाची वक्तव्ये करतात. भाजपमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे शिस्तबध्द समजल्या जाणाऱ्या भाजपचे वर्तन दिवसेंदिवस अधिक ओंगळवाणे होत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin