Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

चाकणमधील सापांच्या विषाच्या तस्करीचे उत्तर प्रदेश कनेक्शन

Main News

चाकण, दी. २८ (पीसीबी) - पुण्याजवळील चाकणमध्ये पोलिसांनी सोमवारी रात्री एका घरावर टाकलेल्या छाप्यात १२५ ते १५० साप आढळून आले होते. या घरात तीन विषाच्या बाटल्याही सापडल्या. सापांच्या विषाची तस्करी करणाऱ्यांवर सर्प मित्र, चाकण पोलीस आणि वनविभागाने कारवाई केली होती. पुण्यातील चाकणमधील सारा सिटी सोसायटीत हा प्रकार सुरु होता. पोलिसांनी सर्प मित्र आणि वन विभागाच्या मदतीने छापा टाकून ही कारवाई केली होती. या प्रकरणी रणजित खारगे आणि धनाजी बेडकुटे यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सापांच्या विषाच्या तस्करीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता यात आणखी दोघांची नावे समोर आली आहेत. तर अटक आरोपी रणजित खारगे यावर विषाच्या तस्करी प्रकरणी मिरज आणि मुंबईमध्ये यापूर्वीचे दोन गुन्हे दाखल असल्याचे उघड आहे. या तस्करीमागे मोठे रॅकेट असल्याचा संशय चाकण पोलिसांनी व्यक्त केला होता, त्या अनुषंगाने तपास सुरु केला असता, यात दोघांची नावे समोर आली आहेत.

 

सांगलीतील डॉ. कदम नावाची व्यक्ती कडेगाव येथून विष घेऊन जात होता. तर दुसरा व्यक्ती पुण्यातून येऊन विष विकत घेत होता. मात्र या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. यामध्ये लवकरच बड्या व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

 

तर उत्तर प्रदेशमधील एक मोठी कंपनी विष खरेदी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. आतापर्यंत ७५ लाख रुपयांपर्यंत विषाची विक्री केल्याची माहिती आरोपींनी दिली आहे. मात्र, यापेक्षा अधिक विक्री झाल्याचा अंदाज चाकण पोलिसांना आहे. अटकेत असलेले रणजित खारगे आणि धनाजी बेडकुटे सापांच्या विषाची तस्करी तीन वर्षांपासून करत होते. चाकणमध्ये त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून ठाण मांडला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin