Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

दौंड तालुक्यात पोस्ट कार्यालयातील पार्सलची चोरी

Main News

पुणे, दि. २७ (पीसीबी) - दौंड तालुक्यातील केडगाव येथील पोस्ट ऑफिसमधील पार्सल चोरीला गेली आहेत. या पार्सलमध्ये घड्याळ व मोबाईलचा समावेश असून याची किंमत १० हजार २१८ रुपये इतकी आहे.
 
पोस्ट ऑफिसचे विटाचे असणारे बांधकाम तोडून पोस्ट ऑफिसमधील पार्सलची चोरी झाली असून या पार्सलमध्ये असणाऱ्या घड्याळ व मोबाईलचा समावेश असून याची किंमत १० हजार २१८ रुपये इतकी आहे. या चोरी प्रकरणी पोस्ट ऑफीस अधिकारी सतीश प्रभाकर सामरे (वय ३८) यांनी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
 
शनिवारी पोस्ट ऑफीसला सुट्टी होती. अज्ञात चोरट्यांनी ऑफिसचे पाठीमागील बाजूचे विटाचे असणारे बांधकाम तोडून आतमध्ये प्रवेश केला. ग्राहकांचे ऑनलाईन पद्धतीने मागवलेल्या पार्सलमध्ये २१८ रुपयांचे घड्याळ आणि एचटीसी कंपनीचा ९ हजार ९९० रुपयांचा किंमतीचा मोबाईल, असा एकूण १० हजार २१८ रुपये किंमतींचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin