Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

लोणावळ्यात ख्रिसमस व न्यू इयरच्या सेलीब्रेशन करणाऱ्यांवर पोलिसांची नजर

Main News

लोणावळा, दि. २३ (पीसीबी) - लोणावळ्यात ख्रिसमस व न्यू इयरच्या पार्टीकरिता राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र, पर्यटनाच्या नावाखाली हुल्लडबाजी करणाऱ्या तळीरामांवर प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमस व न्यू इयरच्या वेळी मोठ्या संख्येने लोक लोणावळ्यात येतात.पर्यटक नशेत बेदरकारपणे वाहने चालवितात. काही लोक धांगडधिंगा करुन सार्वजनिक शांतता भंग करतात. महिलांची छेडछाड, वाहतूक नियमांचा भंग करत वेगात वाहने चालविणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणे अशा तळीरामांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासह खासगी बंगले, फार्म हाऊसमध्ये रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या यांच्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याकरिता पोलीसांनी हॉटेल व्यावसायिकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी शहरातील विविध क्षेत्रातील लोकांची ही उपस्थिती होती.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin