Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

मंचरमध्ये शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या

Main News

मंचर, दि. २२ (पीसीबी) - अवसरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना उघडकीस आली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.
 
स्वाती अनिल ढोबळे (वय १९, मूळ रा. पोण्डशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर येथील अवसरी खुर्द या गावातील शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयात इटीसीच्या दुसऱ्या वर्षात स्वाती अनिल ढोबळे शिकत होती. महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाच्या एका खोलीत दोन विद्यार्थिनीसह ढोबळे राहत होती. सकाळी ढोबळे हिच्या खोलीतील दोन विद्यार्थिनी महाविद्यालयात गेल्या होत्या. यावेळी खोलीतील पंख्याला दोरी बांधून टेबलवर खुर्ची ठेवून स्वाती ढोबळेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी ढोबळेने एका मुलाचे फक्त नाव लिहून ठेवल्याने प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मंचर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin