Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

बारामतीत कंपनीतील बॉयलरच्या स्फोटात पाच जण जखमी

Main News

बारामती, दि. २२ (पीसीबी) - बारामती एमआयडीसीतील इलाईट कॉंक्रिट प्रॉडक्ट कंपनीमध्ये बुधवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये पाचजण गंभीर जखमी झाले.

प्राथमिक माहितीनुसार, जखमी झालेले लोक कंपनीशेजारील युनिक रेसिडेन्सीमध्ये राहणारे आहेत. या गृहनिर्माण सोसायटीतील सदनिकांचे स्फोटामुळे मोठे नुकसान झाले आहे. घरातील टीव्ही, कपाटे, काचेच्या वस्तू, खिडक्यांची तावदाने फुटली आहेत. स्फोटाच्या भीषणतेमुळे लगतचे नागरिक भयभीत झाले आहेत. पाच सदनिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कंपनीलगतची झाडेही उन्मळून पडली आहेत. सुदैवाने या घटनेत कंपनीतील कामगार बचावले. बॉयलरचे तोंड विरूध्द दिशेला असल्याने हे कामगार बचावल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin