Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

दौंडमध्ये वडिलांनी केले मुलाचे अपहरण

Main News

दौंड, दि. २२ (पीसीबी) - आजी आजारी असल्याची बतावणी करुन मुलाला पळवून नेणाऱ्या वडिलांविरोधात दौंड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. हे अपहरण रविवारी (दि. १८) प्रज्ञा वनशिव यांच्या दौंड येथील राहत्या घरातून करण्यात आले.

बालकाची आई प्रज्ञा सुजित वनशिव (वय २३, रा. बंगलासाईड, दौंड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुजित वनशिव, लक्ष्मी गायकवाड (दोघेही रा.वनशिववस्ती, धनकवडी, पुणे) यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्ञा वनशिव आणि त्यांचा मुलगा कार्तिक हे दोघे तीन महिन्यांपासून दौंड येथे आईकडे राहतात. दरम्यान, सुजित याच्याबरोबर सहा वर्षांपूर्वी प्रज्ञाचा विवाह झाला. रविवारी (दि. १८) माझे पती सुजित आणि आजी सासू लक्ष्मी गायकवाड हे दोघे दौंड येथे आले आणि मला म्हणाले, ‘तुझी सासू आजारी आहे. ती कार्तिकची सारखी आठवण काढते, तेव्हा दोन दिवसांसाठी आम्ही कार्तिकला पुण्याला घेऊन जातो,’ असे सांगितल्यानंतर कार्तिकला दोघे घेऊन गेले. 

दरम्यान, प्रज्ञा कार्तिकला आणण्यासाठी पुणे येथे गेली असता, ‘आम्ही मुलाला आणलेले नाहीच,’ असे सांगून प्रज्ञाला तेथून त्यांनी परत दौंडला पाठवले, असे प्रज्ञा वनशिव यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin