Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

शिरुर येथील जवानाच्या कुटुंबीयांना ६२ लाख नुकसान भरपाईचे आदेश

Main News

पुणे, दि. २२ (पीसीबी) - मोटारीच्या धडकेने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लष्करी जवानाच्या कुटुंबीयांना ६२ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश विशेष न्यायाधीश आणि मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य एस. जे. काळे यांनी दिले आहेत.
 
रमेश ठकाराम खणकर (वय ३४, रा. शिरूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. रमेश हे एक महिन्याच्या सुट्टीवर कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले होते. ते ४ मार्च २०१४ रोजी दुचाकीवरून पुणे-नगर रस्त्याने निघाले होते. त्या वेळी मोटारीने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या खणकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

त्याच्या कुटुंबीयांना संबंधित विमा कंपनी कमी नुकसान भरपाई देणार होती. या कारणामुळे खणकर कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली होती. रमेश खणकर यांच्या सेवेचा कालावधी आणि सेवेत मिळणारी पदोन्नती या बाबी विचारात घेऊन न्यायालयाने विमा कंपनीला ६२ लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे लष्करी जवानांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. रमेश यांच्या पश्चात पत्नी, पाच वर्षांचा मुलगा, दोन वर्षांची मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin