Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

तळेगावात रेल्वेतून उडी मारल्याने तरूणीचा मृत्यू; तरूण जखमी

Main News

तळेगाव दाभाडे, दि. २२ (पीसीबी) – तळेगाव दाभाडे येथे राहणाऱ्या एका युवक-युवतीने रेल्वेतून उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी आहे. ही घटना काल बुधवारी (दि.२१) तळेगाव स्टेशन जवळील वतननगर या ठिकाणी घडली. 
 
वैष्णवी हेमंत लोहाट (वय १७) असे या मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव असून प्रणव मधुकर गरुड (वय १८) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दोघे ही तळेगावातीलच रहिवासी असून इंद्रायणी महाविद्यालयात शिकत होते.
 
प्राथमिक माहितीनुसार, नेहमी प्रमाणे वैष्णवी कॉलेजला जाते सांगून घरातून निघाली होती. ती संध्याकाळी उशीरा पर्यंत घरी आलीच नाही. त्यामुळे तिच्या आईने तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रात्री उशीरा वैष्णवीचा शोध घेत असताना पोलिसांना तिचा मृतदेह तळेगाव स्टेशन जवळील वतननगर येथील रेल्वे रुळाजवळ आढळून आला. तसेच येथेच काही अंतरावर पोलिसांना प्रणव जखमी अवस्थेत आढळला. दरम्यान पोलिसांनी हा प्रेम प्रकारणातून आत्महत्येचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. तळेगाव पोलीस तपास करत आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin