Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

खंडाळ्यात जुगार खेळणाऱ्या ९६ व्यापाऱ्यांना अटक; १६ लाख रूपये जप्त

Main News

लोणावळा, दि. १८ (पीसीबी) - खंडाळा येथे एका हॉटेलात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शनिवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या ९६ व्यापाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नव्या दोन हजारांच्या नोटा असणारी तब्बल १६ लाख ९३ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.
 
खंडाळा येथील एका हॉटेलमध्ये जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला त्यावेळी जवळपास १० डाव तीन पानी नावाचा खेळ खेळत होते. त्यांच्याकडून १६ लाख ९० हजार ४८ रुपयांची रोकड व ३२०० रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक जय जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक एस.बी. होडगर यांनी फिर्याद दिली आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin