Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

पुणे जिल्ह्यातील १० नगरपालिकांचा निकाल आज; मतमोजणीची तयारी पूर्ण

Main News

पुणे, दि. १५ (पीसीबी) – नगरपालिकांसाठी झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचा निकाल आज (गुरुवार) जाहीर होणार आहे. मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होईल. पुणे जिल्ह्यातील १० आणि लातूरमधील ४ नगरपालिकांसाठी बुधवारी मतदान पार पडले आहे. एकूण १४ नगरपालिकांसाठी १ हजार ४२६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. 

पुणे जिल्ह्यातील बारामती, लोणावळा,  दौंड, तळेगाव-दाभाडे, आळंदी,  इंदापूर, जेजुरी, जुन्नर, सासवड आणि शिरुरमधील ३२४ जागांवर १ हजार ३२६ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर, औसा, निलंगा आणि अहमदपूर या नगरपालिकांच्या ५० प्रभागांतील १०१ उमेदवार आणि ४ नगराध्यक्षांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.

आतापर्यंत पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मात्र या जिल्ह्यात भाजपने मुसंडी मारली, तर तो अजित पवारांसाठी मोठा धक्का असेल. बारामतीत ३९ सदस्यीय नगरपालिकेत बहुमत मिळविण्याबरोबरच नगराध्यक्ष निवडून आणण्याचे अजित पवार यांच्यासमोर आव्हान आहे. पहिल्या टप्प्यातील १६५ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट झाली. नगराध्यक्षपदांमध्ये राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले. तब्बल ३१ नगरपालिका जिंकून भाजपने मिनी विधानसभेत आघाडी घेतली आहे. सोबतच ५२ ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आले आहेत.


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin