Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

पुणे जिल्ह्यात नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई

Main News

बारामती, दि. १४ (पीसीबी) - पुणे जिल्ह्यातील दहा तर लातूर जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज (बुधवार) मतदान होत आहे. नगरसेवकांच्या एकूण ३२४ जागा असून त्याकरिता १३२६ उमेदवार रिंगणात आहेत. १४ पालिकांमध्ये थेट नगराध्यक्षपदाकरिता १०६ जण रिंगणात आहेत. मतमोजणी गुरुवारी होणार आहे. पुणे या बालेकिल्ल्यात होणाऱ्या दहा नगरपालिकांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई असून, पुण्यात पीछेहाट झाल्यास राष्ट्रवादीच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे पहिल्या टप्प्यातील विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी भाजपने सारा जोर लावला आहे.

सर्वांचे लक्ष हे बारामती पालिकेच्या निकालाकडे आहे. ३९ सदस्यीय नगरपालिकेत बहुमत मिळविण्याबरोबरच नगराध्यक्ष निवडून आणण्याचे अजित पवार यांच्यासमोर आव्हान आहे. पहिल्या टप्प्यातील १६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट झाली. नगराध्यक्षपदांमध्ये राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर आहे. पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने शिरकाव केला आहे. राष्ट्रवादीकरिता हा धोक्याचा इशारा मानला जातो. बारामतीमध्ये फटका बसल्यास तो राष्ट्रवादीकरिता मोठा धक्का असेल. यामुळेच अजित पवार यांनी लक्ष घातले. प्रचाराकरिता बारामतीमध्ये ठाण मांडून बसले होते. 

बारामती म्हणजे पवार हे समीकरण असल्याने राष्ट्रवादीला फार काही धोका नाही, असे मानले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी बारामतीमध्ये प्रचार सभा घेतली. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये बारामतीने राष्ट्रवादीला भरभरून साथ दिली. यामुळेच राष्ट्रवादीचे नेते आशावादी आहेत. पुणे जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत २१ पैकी राष्ट्रवादीचे फक्त तीन आमदार निवडून आले होते. नगरपालिका निवडणुकीत पराभवाचा फटका बसल्यास आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळेच कोणत्याही परिस्थितीत पुण्यात आपले वर्चस्व कायम राखण्याकरिता अजित पवार यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत.

इंदापूरमध्ये काँग्रेस नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्ता भारणे यांनी त्यांचा पराभव केला होता. अलीकडेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पाटील गटाचा पराभव झाला. यामुळेच नगरपालिका निवडणुकीत पाटील यांनी लक्ष घातले. एकाचा अपवाद वगळता सर्व जुन्या नगरसेवकांना घरी बसवून नव्या चेहऱ्यांना पाटील यांनी संधी दिली आहे. पाटील विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष पालिका निवडणुकीतही कायम आहे.  लोणावळा, तळेगाव-दाभाडे, शिरुर या पालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने जोर लावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

लातूरमधील चारही पालिकांच्या निवडणुका जिंकण्याकरिता पालकमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी मेहनत घेतली आहे. पहिल्या टप्प्यात मराठवाड्यात मर्यादित यश मिळाल्याने भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. चारपैकी सध्या प्रत्येकी दोन पालिकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. शिवसेनाही लातूरमध्ये यश मिळविण्याकरिता प्रयत्नशील आहे. एमआयएमने मुस्लीमबहुल भागात चांगली कामगिरी केल्यास त्याचा काँग्रेसला फटका बसू शकतो. चारही पालिकांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे.

भाजपची कसोटी

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत सर्वाधिक ५१ नगराध्यक्षपदे आणि ८९३ सदस्य निवडून आलेल्या भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. दुसऱ्या टप्प्यातही १४ पालिकांमध्ये चांगले यश मिळेल, असा आशावाद भाजपमध्ये आहे. बारामतीसह बहुतेक सर्व शहरांमध्ये मुख्यमंत्र्यांनी दौरे केले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin