Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

पैशांवर माज करणाऱ्यांचे दिवस संपले – मुख्यमंत्री

Main News

बारामती, दि. ११ (पीसीबी) - राज्यकर्तेच ठेकेदार बनल्याने नगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत. मात्र, आता सरकारने तेथील कामाचे ऑडिट करण्यासाठी त्रयस्थ यंत्रणा नेमली आहे. जनतेच्या पैशावर माज करणाऱ्यांचे दिवस संपले आहेत. आम्हाला जनतेच्या तिजोऱ्या भरायच्या आहेत नेत्यांच्या नाहीत, असा हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतील प्रचारसभेत चढविला.

फडणवीस यांनी जिल्ह्यात बारामती, लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी आणि शिरूरमध्ये प्रचारसभा घेतल्या. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, योगेश टिळेकर आदी या वेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, “बारामती धनदांडग्याची नाही, ती गरिबांची, शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची आहे. राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निकाल म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे. हे परिवर्तन यंदा बारामतीतही दिसेल. बारामतीकरांनी सत्तापरिवर्तन केल्यास राज्याची तिजोरी बारामती शहराच्या विकासासाठी खुली राहिल. काळा पैसा, भ्रष्टाचारविरुद्धच्या लढाईत बारामतीकरांची साथ हवी आहे, असे आवाहन त्यांनी केले.”

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin