Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

बारामतीत राष्ट्रवादीचा सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष

Main News

बारामती, दि. १० (पीसीबी) - बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सुरक्षित मतदार संघ मानला जायचा. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधकांनी एकत्र येऊन बारामतीत नगरपरिषद निवडणुकीत बारामती विकास आघाडीच्या माघ्यमातून राष्ट्रवादीपुढे चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. या विकास आघाडीला भाजपचेही बळ मिळाले आहे. त्या शिवाय अपक्ष, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, मनसे, काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टी हेही नगरपरिषद निवडणुकीत त्यांचे बळ आजमावत आहेत.

पुणे जिल्ह्यातील दहापैकी सहा नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवत आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचेच नेहमीप्रमाणे वर्चस्व राहील, असा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केला आहे. बारामतीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे प्रचार सभा घेणार आहेत. तसेच बारामती विकास आघाडीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे प्रचारसभा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात भाजपने बारामती विकास आघाडीच्या माध्यमातून आव्हान निर्माण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा एक नंबरचा राजकीय शत्रूपक्ष आहे. सध्या भाजपला चांगले दिवस आहेत. तेव्हा बारामतीत या वेळी परिवर्तन निश्चिपणे होणार असा दावा पालकमंत्री बापट यांनी केला आहे.

बारामतीत भाजपने अन्य काही जणांना बरोबर घेऊन विकास आघाडी केली आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपला पक्षाचा उमेदवार देता आलेला नाही. प्रत्यक्षात भाजपने उमेदवार दिला होता. मात्र आघाडीचा निर्णय झाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवार आघाडीतून देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. पवार आणि मोदी हे एकमेकांची स्तुती करतात. मात्र पक्षाच्या राजकारणात आम्ही एकमेकांचे कट्टर विरोधक आहोत, असेही भाजपकडून सांगितले जात आहे. बारामतीतील निवडणूक प्रचार अंतिम टप्यात आहे. निवडणुकीच्या मैदानात आजी-माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक उतरले आहेत. या निवडणुकीत गिरीश बापट आणि अजित पवार यांचा कस लागणार आहे. या दोघांपैकी कोण बाजी मारणार आणि कोण राजकीय स्थान पक्के करणार याचेही औत्सुक्य आहे. 

बारामती नगरपरिषदेच्या या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पैसे खर्च करू शकणाऱ्यांना आणि धनशक्ती असणाऱ्यांना उमेदवार म्हणून संधी दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे मूळच्या निष्ठावंतांना संधी मिळू शकलेली नाही. अशा नाराज झालेल्यांची नाराजी दूर कशी करायची हाही मुद्दा राजकीय पक्षांपुढे उभा आहे. नगरपरिषदेत ७५ हजार २७६ मतदार असून त्यात पुरुष मतदारांची संख्या ३८ हजार १८२ आहे, तर महिला मतदारांची संख्या ३७ हजार ९४ आहेत. बारामतीमधील १९ प्रभागांतून ३९ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे एकूण ४० जण निवडून येतील. बारामती नगरपरिषेचा अ वर्ग नगरपरिषदेत समावेश झाला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपरिषद म्हणून बारामती नगरीची ओळख आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin