Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

पुणे जिल्ह्यातील पिंपरी बुद्रूक देशातील पहिले कॅशलेस गाव

Main News

पुणे, दि. ९ (पीसीबी)  - देशाला कॅशलेस बनविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची एकीकडे विरोधक खिल्ली उडवत असताना पुणे जिल्ह्यातील पिंपरी बुद्रूक या गावाने मात्र देशातील पहिले कॅशलेस गाव होण्याचा मान मिळविला आहे. या गावात रेशनपासून ते दैनंदिन जीवनासाठी लागणारे सर्वच व्यवहार ऑनलाइन होत आहेत.

भामा नदीच्या काठावर हे गाव असून गावाची लोकसंख्या जेमतेम केवळ २ हजार ८०० एवढी आहे. पुणे शहरापासून ६१ किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे गाव खऱ्या अर्थाने डिजिटल झाले आहे. या गावाला कॅशलेस करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने बँकींगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

केंद्र सरकारच्या सेंटर फॉर गुड गव्हर्न्सनेही या गावाला बुधवारी कॅशलेस गाव म्हणून जाहिर केले आहे. या गावातील प्रत्येक गावकऱ्याचे बँकेत खाते आहे. त्यामुळे या गावातील लोक दळणापासून ते रेशनिंग पर्यंतचे सर्व व्यवहार कॅशलेस पद्धतीने करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin