Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

औंढे गावचे माजी सरपंच नितीन खाडेंचा दरोडेखोरांच्या हल्ल्यात मृत्यू

Main News

लोणावळा, दि. ९ (पीसीबी)  लोणावळ्याजवळील औंढे गावात दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले गावचे माजी सरपंच नितीन बबन खाडे यांचे चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. गुरूवारी (दि. ८) पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास दरोडेखोरांनी खाडे यांच्या घरावर दरोडा टाकला होता. 
 
दरोडेखोरांनी खाडे यांच्या घरावर टाकलेल्या दरोड्यात सोन्यांचा  गंठण, कर्णफुले, घरातील रोख रक्कम आणि मोबाईल लुटून नेला. खाडे यांनी त्याला प्रतिकार केल्या असता दरोडेखोरांनी लोखंडी कटावणीने त्यांच्या डोक्यात मारले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. तसेच दरोडेखोरांनी त्यांच्या पत्नीलाही मारहाण केली होती. खाडे यांना चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. परंतु, उपचारा दरम्यान गुरूवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. 
 
 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin