Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Main News

पुणे, दि. १ (पीसीबी) - राज्य निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील जानेवारी ते  मे,२०१७ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या सहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  या कार्यक्रमानुसार  निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्यात येणार असून दि. ६ ते १३ डिसेंबर दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यत नामनिर्देशनपत्रे मागविणे व सादर करणे, १४ डिसेंबर, २०१६ रोजी सकाळी ११ वाजेपासून छाननी संपेपर्यत नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे.

नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यासाठी अंतिम दिनांक १६ डिसेंबर, २०१६ असून दुपारी ३ वाजेपर्यत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह नेमून देण्यात येवून अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.  आवश्यक असल्यास २८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० पर्यत मतदान घेण्यात येणार आहे. २८ डिसेंबर रोजी  जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ) तहसीलदार निश्चित करतील. २९ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल प्रसिध्द करण्यात येणार आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin