Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

इंदापूर येथील भूकरमापकास लाच घेताना अटक

Main News

इंदापूर, दि. २८ (पीसीबी) - शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी शेतकऱ्याकडे बारा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका भूकरमापकास अटक केली. ही कारवाई आज सकाळी अकराच्या सुमारास इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात करण्यात आली.

विष्णू गोविंद वाळके (वय ५६, भूकरमापक, भूमी अभिलेख कार्यालय, इंदापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एका शेतकऱ्याने पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर येथे तक्रारदाता शेतकऱ्याची शेतजमीन आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांनी इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातून त्या जागेची मोजणी करुन घेतली होती. यामोजणीचा 'क' उतारा त्याना पाहिजे होता. यावर त्यांनी इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लोकसेवक वाळके यांनी त्याची मागणी केली होती. मात्र वाळके यांनी त्या बदले बारा हजार रुपयांची लाच फिर्यादीच्या वडिलांकडे मागितली. यावर आज लाचलुचपत विभागाने सापळा रचून वाळके यांनी रंगेहाथ लाच स्वीकारताना पकडले. त्याच्यावर इंदापूर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण येथे प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin