Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

लोणी काळभोर येथे महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांचे सोने पळवले

Main News

लोणी काळभोर, दि. २८ (पीसीबी) - नातेवाइकाचा विवाह पार पडल्यानंतर घरी परतत असताना महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे साडेसात तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसकावून लांबवले. ही घटना शुक्रवारी (दि.२५) रात्री नऊच्या सुमारास कवडीपाट टोलनाका येथे घडली.
 
याप्रकरणी ज्योती संदीप भोसले (वय ३५, रा. कर्वेनगर, कॅनॉलोड गल्ली क्रमांक, चंद्रभागा निवास, कॅम्प, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती भोसले या आपल्या मावस भावाचा मेव्हणा सागर घनवट याच्या विवाहास आपल्या नातेवाईकांसोबत लोणी काळभोर येथे आल्या होत्या. विवाह झाल्यानंतर ज्योती भोसले त्यांची गाडी (एमएच १२ जेएस ७६७६) महामार्गावर लावली असल्याने ते सर्वजण ओढ्याच्या कडेच्या कच्च्या रस्त्याने पायी गाडीकडे जात होते. यावेळी अंधाराचा फायदा घेत अचानक एका चोरट्यांनी ज्योती यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे साडेसात तोळ्याचे सोन्याचे गंठण व मोहनमाळ हाताने हिसकावून तोडली व शेजारी असलेल्या केळीच्या बागेत पळून गेला. लोणी काळभोर पोलीस तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin