Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

शॉर्टसर्किटमुळे तीन घरे जळून खाक; लाखोंचे नुकसान

Main News

उरुळीकांचन, दि. २७ (पीसीबी) - वळती येथील वरचामळा-फाटेवस्ती या ठिकाणी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन घरे जळून खाक झाली आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. २५) दुपारी १२ च्या सुमारास घडली. मात्र, या गावातील लग्न नजीकच्या कुंजीरवाडी येथे असल्यामुळे घरांमध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली. या दुर्घटनेत जवळपास २५ ते ३० लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती तलाठी योगीराज कनीचे यांनी दिली.
 
ज्ञानदेव कुंजीर, दत्तात्रय कुंजीर व राजाराम कुंजीर या ग्रामस्थांची जुन्या पद्धतीची माळवद व सागवानी तुळ्या असणारी घरे या आगीच्या दुर्घटनेत पूर्णपणे जळून खाक झाली. घरातील टीव्ही, फ्रीज, कुलर, कपडे, भांडी आदी वस्तू जळाल्या. या तीनही घरांची राखण करण्यासाठी एक वयस्कर आजीबाई फक्त तेथे होत्या. पण रखरखत्या उन्हात लागलेल्या आगीने तातडीने भीषण स्वरूप धारण केल्याने आगीवर नियंत्रण आणता आले नाही.
 
सर्व प्रथम राजाराम मल्हारी कुंजीर यांच्या घरातून धूर येऊ लागल्याने वयस्कर आजीबाई ओरडू लागल्या. त्यामुळे तेथे लोक जमा झाले. आग विझवण्यासाठी आरडाओरडा सुरू झाला. पण, जवळपास पाणी नसल्याने या कामात अडथळा आल्याने व घरमालक नसल्याने घरे पूर्णपणे जळून खाक झाली. सर्वप्रथम महावितरणच्या अधिकारी प्रियांका जाधव तिथे हजर झाल्या. त्यानंतर गाव कामगार तलाठी योगीराज कनीचे घटनास्थळी दाखल झाले. आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin