Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

चाकण येथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या १३ जणांना अटक

Main News

चाकण, दि. २५ (पीसीबी) -  येथील पुणे-नाशिक महामार्गावरील हॉटेल भारत लॉजवर पुणे सीआयडी पोलीस व चाकण पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या १३ जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी (दि.२३) रात्री साडे नऊच्या सुमारास करण्यात आली.

याप्रकरणी रंजन श्रीमंत गायन (वय २४, रा. कलकत्ता), सुधीर शाम शेट्टी (वय ३०, रा. उडपी बेंगलोर), संजीत माखनदास (वय २२, रा. चाकण), अनिकेत दिलीप घोडेकर (वय २३, रा. महात्मा फुले चौक, चाकण), महेश रमेश कोळी (वय २७, रा. वाफगाव) व संतोष मारुती राक्षे (वय ३१, रा. राक्षेवाडी, चाकण) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिटा कायद्यानुसार केलेल्या कारवाईत सहा पुरुष आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सात मुलींना ताब्यात घेऊन त्यांची महिला सुधार गृहात रवानगी करण्यात आली. अधिक तपास चाकण पोलिस करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin