Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

पुण्यातील एमजी रोडवर १ कोटी १२ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

Main News

पुणे, दि. २५ (पीसीबी) – पुण्यातील महात्मा गांधी रस्त्यालगत  (एमजी रोड) असलेल्या कॅनरा बँकेजवळ १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांच्या हजार व पाचशेच्या जुन्या नोटा बदलून घेण्यास आलेल्या एकाला अटक करण्यात आली. ही कारवाई काल (गुरूवार) रात्रीच्या सुमारास करण्यात आली.

भरत राजमल शहा यांच्याकडे ही रोकड सापडली आहे. त्यांच्याकडील कापडी पिशवीत १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांच्या हजार व पाचशेच्या जुन्या नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. शहा बांधकाम साहित्य पुरविणारा व्यावसायिक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे परिमंडळ दोन व लष्कर पोलिसांना पुण्यातील एमजी रोड परिसरातील कॅनरा बँकेजवळ शहा हे पैसे बदलण्यास येणार असल्याची खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून शहा यांच्याजवळील कापडी पिशवीत ठेवलेले एकूण १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांच्या हजार व पाचशेच्या जुन्या नोटा ताब्यात घेतल्या. त्यामध्ये  २२ हजार ४४४ नोटा पाचशे रुपयांच्या, तर २८ नोटा या हजाराच्या आढळल्या आहेत. याप्रकरणी शहा यांची चौकशी केली असता त्यांनी ही रक्कम बँकेतून बदलून घेण्यासाठी आणली असल्याचे स्पष्टकरण दिले. पोलिसांनी ही सर्व रक्कम ठाण्यात ठेवली असून, शहा यांना अधिक चौकशीसाठी पुण्यातील आयकर विभागात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin