Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

राजगुरुनगर येथे बँक व्यवस्थापकाची गळफास घेवून आत्महत्या

Main News

राजगुरुनगर, दि. २३ (पीसीबी) - लोणी-धामणी (ता. आंबेगाव) येथील सिंडीकेट बँकेचे शाखा व्यवस्थापक विनय राघव अय्यंगार (वय ३६, मुळगाव- विजयनगर, म्हैसूर) यांनी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
 
लोणी येथील बँकेत शाखा व्यवस्थापक असलेले अय्यंगार हे राजगुरुनगर येथे दोन वर्षांपासून संतोष पडवळ यांच्या रुमध्ये एकटेच भाड्याने राहत होते. अय्यंगार बँकेत कामावर आले नाहीत म्हणून बँकेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना अनेकदा फोन केला. मात्र ते प्रतिसाद देत नव्हते म्हणून बँकेचे कर्मचारी दुला मोरमारे आणि गौरव माथूर हे त्यांच्या घरी गेले. रुमला आतून कडी होती. त्यांनी दरवाजा ठोठावून आणि बेल वाजवूनही ते दरवाजा उघडत नव्हते. म्हणून त्यांनी सदनिकेचे मालक संतोष पडवळ यांना आणि पोलिसांना बोलावून घेतले आणि दरवाजा उघडला.
 
अय्यंगार यांनी छताच्या हुकाला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. आत्महत्या करण्यापूर्वी विनय अय्यंगार यांनी चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यात माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही दोषी धरू नये, मला जगायचे नव्हते, असे लिहून ठेवले होते. अय्यंगार हे अविवाहित होते. त्यांच्यामागे आई-वडील, बहीण असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदिप जाधव हे करीत आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin