Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

इंदापूर बाजार समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व; हर्षवर्धन पाटील यांना धक्का

Main News

इंदापूर, दि. २१ (पीसीबी) - इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसप्रणित कर्मयोगी शंकरराव पाटील शेतकरी विकास पॅनलचा धक्कादायक पराभव झाला आहे. बाजार समितीच्या १९ जागांपैकी १६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलने विजय मिळवला.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकमेकांवर प्रथमच जाहीर टीका केली होती. त्यामुळे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, आजचा निकाल हा अनेकांसाठी धक्कादायक होता. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाल्यापासून हर्षवर्धन पाटील यांच्या गटाचे बाजार समितीवर एकहाती वर्चस्व होते. मात्र, आजच्या निकालांनी हे वर्चस्व पूर्णपणे मोडीत निघाले आहे.

या निवडणुकीत तब्बल ९८ टक्के मतदान झाले. पळसदेव येथील मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान झाले होते. याशिवाय, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रसेने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसने याठिकाणी १९ जागा जिंकल्या. तर दौंड तालुक्यात विद्यमान आमदार राहुल कूल यांनाही पराभवाचा झटका बसला. माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने १९ जागा जिंकून बाजार समितीची एकहाती सत्ता मिळवली आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin