Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

अनैतिक संबंधातून खेडमधील एकाचा खून

Main News

खेड, दि. १४ (पीसीबी) – आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरुन व  वडिलांना उसने दिलेले पैसे परत का मागितले म्हणून आई आणि दोन मुलांनी संगनमताने एका ५५ वर्षीय वृध्दावर धारधार हत्याराने वार करुन त्याचा निर्घुण खुन केला आहे. ही घटना शनिवार (दि. १२) ते रविवार (दि. १३) दरम्यान खेडमधील वाफगाव रस्त्यावरील गुळाणी घाटात उघडकीस आली.

जिजाभाऊ पाडुरंग वरुडे (वय ५५, रा. वडगाव पाटोळे, ता. खेड) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा परशुराम जिजाभाऊ वरुडे (वय २८, रा. वडगाव पाटोळे, ता. खेड) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम वरुडे यांचे वडील जिजाभाऊ वरुडे यांचे गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. तसेच त्यांनी महिलेच्या पतीला चार ते पाच लाख रुपये उसने दिलेले होते. ते पैसे त्यांनी परत मागितले होते. परंतु, उसने दिलेले पैसे का मागितले म्हणून व अनैतीक संबंध प्रस्थापित केल्याचा राग मनात धरुन संबंधित महिलेने व त्यांची दोन मुले प्रविण वरुडे व प्रमोद वरुडे यांनी धारदार शस्त्रांनी गळ्यावर व पोटावर वार करुन त्यांची हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जिजाभाऊंचे प्रेत खेडमधील वाफगाव रोडवरील गुळवणी घाटामध्ये असलेल्या जंगलात टाकून दिले. खेड पोलिस तपास करत आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin