Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी

Main News

हवेली, दि. ८ (पीसीबी) – देहूरोड कॅंटोन्मेंटच्या हद्दीतील माळरानावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपच्या वतीने कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, माळरानावर कॅंटोन्मेंट बोर्डाकडून कचरा टाकून त्याला जाळण्यात येते. त्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी व धुरामुळे देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीच्या जवळच असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, निगडी गावठाण, रूपीनगर, यमुनानगर व त्रीवेणीनगर या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून त्यांना विविध आजारांची लागण होत आहे.

तेव्हा नागरिकांच्या हितार्थ कॅंटोन्मेंट बोर्डाकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची योग्य रितीने विल्हेवाट लावण्यात यावी व नागरिकांच्या आरोग्याचा निर्माण झालेला बिकट प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा, अशी विनंती संघटनेचे सतिश कदम व दिपक खैरनार यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin