Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

एकविरा देवीच्या मंदिरातून साडेसहा लाखांच्या दागिन्यांची चोरी

Main News

लोणावळा, दि. ७ (पीसीबी) - लोणावळ्याजवळील कार्ला गड पायथा येथील एकविरा देवीच्या पुरातन मंदिरातून पैशांनी भरलेल्या दोन दानपेट्या, देवीचा चांदीचा मुकुट आणि देवीच्या कानातील सुर्वण कर्णफुले असा अंदाजे साडेसहा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घटना रविवारी (दि.६) मध्यरात्री घडली.

देवीच्या गळ्यात साडे अकरा तोळ्यांचा सुवर्ण हार होता पण फुलांच्या माळांनी तो झाकला गेला असल्याने चोरांची त्यावर नजर गेली नाही. त्यामुळे सुदैवाने हा हार चोरट्याचे हाती लागला नाही.  

सोमवारी पहाटे पाच वाजता पुजारी निखिल नाकवा यांना हा प्रकार पहिल्यांदा लक्षात आला. त्यांनी तत्काळ गावचे माजी सरपंच गणपत पडवळ, सुरेश गायकवाड, मधुकर पडवळ आदींना याबाबत माहिती दिली. याबाबत माहिती कळताच परिसरात शोधाशोध केली असता मंदिरापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर दानपेट्या दिसल्या. चोरट्यांनी या दानपेट्यांचे लॉक तोडून आतमधील सर्व पैसे काढून घेतल्याचे आणि तिथून पळ काढल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin