Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

आळंदीत घरफोडी व पादचाऱ्यांची लूट करून सव्वा लाख लंपास

Main News

आळंदी, दि. २९ (पीसीबी) – आळंदीत चोरी आणि घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी सव्वा लाख रुपये लांबविले आहेत. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पहिल्या घटनेत कल्पना विठ्ठल शेटे (वय ४५, रा. आकांक्षा अपार्टमेंट, फ्लॅट क्रं १४, दत्त मंदिर रोड, आळंदी) यांच्या राहत्या घरी तर दुसऱ्या घटनेत जितेंद्र संभाजी ढोणे (वय २७, रा. अशोक गावडे पाटील चाळ, विकासवाडी धानोरे) व त्यांचा मित्र सूर्यभान गजबे हे दोघे पायी जात असताना चोरट्यांनी लुटले. या दोन्ही प्रकरणात आळंदी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ढोणे व त्यांचा मित्र गजबे हे १३ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे एक वाजता आळंदी मरकळ रोडवर हॉटेल कोकण किनारा जवळील रस्त्यावरून पायी जात होते. त्यावेळी मागून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या जवळील सॅमसंग व ओपो कंपनीचे एकूण दहा हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन तसेच ढोणे यांच्याकडील रोख रक्कम ६५०० रुपये व गजबे यांच्याकडील रोख रक्कम २५०० रुपये लुटून नेले. 

दुसऱ्या घटनेत कल्पना शेटे यांच्या राहत्या घरात शुक्रवारी (दि. २८) सकाळी साडेआठ ते साडेचारच्या दरम्यान चोरट्यांनी बंद घराचे दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून कपाटातील  २६ हजार ८०० किंमतीचा सोन्याचा राणीहार चोरुन नेला. आळंदी पोलिस तपास करीत आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin