Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

घोरपडीगावातील रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकणाऱ्या आठ जणांवर गुन्हा

Main News

पुणे, दि. २७ (पीसीबी) -  रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असलेल्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई आज घोरपडीगाव येथे केली.
 
याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोरख किसन कुऱ्हाडे (वय २८, रा. कात्रज), अनिल किसन मटकर (वय ३२, रा. माळवाडी), शंकर शांताराम गायकवाड (रा. हडपसर), विलास किसन मटकर, उमेश शंकर मारकड (रा. शेलारवस्ती देहुरोड), वैशाली काकासाहेब कांबळे (रा. शिंदे वस्ती, घोरपडी गाव), रमेश किसन मटकर, उत्तेश्र्वर दत्तू बोराडे (वय ४२, रा. खेडशिवापूर) यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यासाठी लाखो रुपयांचे गहू व तांदूळ कल्याणी महिला बचत गटाला वितरीत करण्यात आले होते. या धान्यातील गहू आणि तांदूळ काळ्या बाजारात विकण्यासाठी ट्रकमधून नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस व पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून  एक ट्रक, एक टेम्पो, दोनशे पोती तांदूळ व १७९ पोती गहू असा एकूण २६ लाख ७९ हजार रुपयांचा माल जप्त केला. पोलिसांनी कल्याणी महिला बचत गटाचे दुकान सील केले आहे. 

पुढील तपास मुंढवा पोलिस करीत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin