Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


पिंपरीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला अटक


Main News

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - आजीकडे राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लग्न लावण्याचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीने अपत्याला जन्म दिला आहे.  

या प्रकरणी आनंद हरी पवार (वय ४५, रा. मूळ गाव चिंचोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे. 

पीडित मुलगी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या आजीकडे राहते. आनंद पवार हा पीडित मुलीच्या आजीच्या घराशेजारी भाड्याने राहतो. पवार हा चालक म्हणून काम करत आहे. तो सतत काहीतरी बहाणा करून पीडित मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. मी तुझा सांभाळ करून लग्न लावून देतो, घर देतो असे आमिष दाखवत होता. त्यांने पीडितेच्या इच्छेविरूद्ध १७ मार्च २०१६ ते डिसेंबर २०१६ या काळात वारंवार त्याने तिच्यावर बलात्कार केला. यात पीडित मुलगी गर्भवती राहिली व तिने एका अपत्याला जन्म दिला.

याप्रकरणी पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक आर.टी. सावंत अधिक तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin