Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


मित्रांच्याच वस्तूंवर डल्ला मारणाऱ्या चोरट्याला निगडी पोलिसांनी फेसबुकच्या सहाय्याने पकडले


Main News

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – मुलाखत देण्यासाठी  आल्याचा खोटा बहाणा करुन मित्रांच्या खोलीतून लॅपटॉप, मोबाईल, चार्जर, बूट चोरणाऱ्या चोरट्याला निगडी पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. फेसबुकचा वापर करून पोलिसांनी त्याला जाळ्यात अडकविले. त्याच्याकडून एकूण १ लाख २७ हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

ताबाण जायरखान पठाण (वय २१ रा. जी वॉर्ड इराणा चाळ, गुरुद्वाराजवळ लोणावळा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताबाण पठाण मुलाखत देण्यासाठी आलो आहे,  असे सांगून प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक २६ मध्ये भाड्याने राहत असलेल्या मित्रांच्या खोलीवर राहण्यासाठी आला होता. मित्र रुमवर नसताना त्यांचे लॅपटॉप, मोबाईल, चार्जर, बूट घेऊन  तो पसार झाला. याप्रकरणी मित्रांनी मंगळवारी (दि. १०) निगडी पोलिसांत तक्रार दिली होती. 

पोलिसांनी त्याच्या मोबाईलवर फोन करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद दाखवत होता. नंतर त्याला फेसबुकवर शोधले असता तो ऑनलाइन दिसून आला.  पोलिसांनी फेसबुकवर मुलीच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्याने ती स्वीकारली. नंतर त्याच्याशी चॅटिंग करून त्याचा विश्वास संपादन केला. त्याने पुणे स्टेशन येथे राहत असल्याचे सांगितले.  त्यानंतर त्याला आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळ भेटण्यासाठी बोलावले.

पोलिसांनी त्याच्या मित्रांना सोबत घेऊन रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. एका महिला पोलिसाला साध्या वेशात स्थानक परिसरात उभे करण्यात आले. तो स्थानकाजवळ आल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला ओळखले. त्यानंतर पोलिसांनी त्याला जागेवरच जेरंबद करून पोलिस ठाण्यात आणले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीचा गुन्हा कबूल केला. त्याच्याकडून चोरीस गेलेला लॅपटॉप, मोबाईल, चार्जर, बूट असा एकूण १ लाख २७ हजार  रुपयांचा माल  जप्त करण्यात आला  आहे. त्याला न्यायालयापुढे उभे केले असता १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता  पोलिसांनी वर्तवीली जात आहे. निगडी पोलिस तपास करत आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin