Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


वल्लभनगर आगारात सुरक्षितता पंधरवडा मोहीम


Main News

पिंपरी, दि.११ (पीसीबी) - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने वल्लभनगर आगारात वाहतूक सुरक्षितता पंधरवडा मोहीम राबविण्यात येत आहे. त्या निमित्ताने अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

यावेळी चिंचवड वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया कारंडे यांनी वाहतुकीचे नियम, मद्यपान करून वाहन चालवू नका. लेन कटींग करू नका. सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्विकृत सदस्य शरद लुनावत, ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या मंजुषा दिदी, सुमनदीदी, पत्रकार दादासाहेब आढाव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. 

या कार्यक्रमाला स्वायत्त श्रमिक महिला संघटनेच्या निर्मला जगताप, पत्रकार मदन जोशी, भालदार, प्रवासी संघटनेचे कदम, ज्ञानेश्वर मलशेट्टी, हेमंत खामकर, मच्छिंद्र जगताप, रघुनाथ गेंगजे, एस.के. थोरात, चंदा भोकटे आदी उपस्थित होते.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन लोंढे यांनी केले. आभार आर.टी.जाधव यांनी मानले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin