Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


महापालिका निवडणुकीसाठी रासपची भाजपकडे २१ जागांची मागणी


Main News

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपकडे २१ जागांची मागणी केली आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष विश्वास मोटे यांनी दिली. 

महापालिका निवडणुकीत युती करण्यासंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे खासदार अमर साबळे यांच्यासोबत प्राथमिक चर्चा केली. त्यामध्ये कोणत्या जागा भाजपने राष्ट्रीय समाज पक्षाला द्याव्यात, यावर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर खासदार अमर साबळे यांनी यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी विचारविनिमय करून राष्ट्रीय समाज पक्षाला किती जागा द्यायच्या, यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे आश्वासन दिले. 

यावेळी कार्तिक लांडगे, रासपचे शहराध्यक्ष विश्वास मोटे, उपाध्यक्ष भाऊसाहेब हारणावळ, ज्येष्ठ नेते नाना गावडे, चिंचवड अध्यक्ष भरत महानवर, भोसरी अध्यक्ष राजाभाऊ धायगुडे, विनोद महाजन, सचिन शिंदे उपस्थित होते. 

राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपकडे प्रभाग क्रमांक १ मधील अ आणि ब, प्रभाग क्रमांक २, ४, १७, व २७ मधील अ, प्रभाग क्रमांक ९, १६, १८, १९, २२, २३, ३१ आणि ३२ मधील ब, प्रभाग क्रमांक १० मधील ब आणि ड, प्रभाग क्रमांक क आणि ड, प्रभाग क्रमांक १२ मधील ब आणि ड, प्रभाग क्रमांक २५ मधील क अशा एकूण २१ जागांची मागणी केली आहे.

 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin