Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


चार महिन्यांचा पगार न मिळाल्यामुळे पिंपरीत सुरक्षारक्षकाने एटीएमला ठोकले टाळे


Main News

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - चार महिन्यांचा पगार न दिल्यामुळे वैतागलेल्या खासगी सुरक्षारक्षकाने पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोरील सेंट्रल बँकेच्या एटीएमला शनिवारी (दि. ७) टाळे ठोकले. पगार मिळाला नसल्यामुळे मी एटीएम बंद ठेवले आहे, असे एका कागदावर लिहून ते शटरवर चिटकवले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन एटीएम उघडले. 

महापालिका भवनासमोरील कमला क्रॉस इमारत आहे. या इमारतीत सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा आणि एटीएम केंद्र आहे. या बँकेची सुरक्षा नोबेल प्रोटेक्शन या सुरक्षा एजन्सीकडे आहे. या एजन्सीने बँकेच्या एटीएम केंद्रावर बी. बी. निर्मल यांची सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक केली आहे. मात्र त्यांना गेल्या पगार देण्यात आलेला नाही. वारंवार मागूनही पगार न मिळाल्यामुळे त्यांनी वैतागून शनिवारी एटीएमलाच टाळे ठोकले.

त्यांनी माझा ४ महिन्यापासून पगार न मिळाल्यामुळे मी एटीएम बंद ठेवले आहे, असे एका कागदावर लिहून ते  एटीएमच्या शटरवर चिकटवले. हा प्रकार पिंपरी पोलिस ठाण्यात कळताच पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी एटीएमचा दरवाजा उघडून एटीएम सुरू केले. तसेच सुरक्षारक्षकाला पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहेत. 

 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin